Top News तंत्रज्ञान देश

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

नवी दिल्ली | महिंद्रा आणि महिद्रा कंपनीच्या स्काॅर्पिओच्या गाडी भारतात मोठी क्रेझ पहायला मिळते. गावागावात, राजकारणात स्काॅर्पिओचं मोठं फ्याड असलेलं दिसून येतं. स्काॅर्पिओ म्हणजे हाय क्लास समजलं जातं, अशा गाड्यांना भारतात मोठी मागणी देखील असते. ग्राहकांचा वाढता कल पाहून कंपनीने ‘आकर्षक आणि स्वस्त’ स्काॅर्पिओचं नविन माॅडेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी लवकरच आपली ही स्वस्तातली स्कॉर्पिओ भारतीय बाजारात उतरवणार आहे. या गाडीचं नाव S3+ व्हेरियंट आहे. या गाडीला कंपनीने आपल्या वेबसाइटवर लिस्ट केलं आहे. महिंद्राच्या टॉप मॉडेल स्कॉर्पिओच्या ही सर्वात स्वस्त गाडी असणार असून कंपनीने गाडीच्या किंमतीबद्दल अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. साधारणतः 12 लाख रुपये इतकी या गाडीची किंमत असू शकते. जून 2021च्या आधी महिंद्रा स्काॅर्पिओ S3+ व्हेरियंट लाँच करेल.

सध्या स्काॅर्पिओमध्ये S5,S7,S9 आणि S11 या चार प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत. आता सध्या बाजारात S5 ची किंमत 12.67 लाख रुपये आहे. S11 ही स्काॅर्पिओमधली सर्वात महाग म्हणजे 16.52 लाखात उपलब्ध आहे. त्यामुळे स्काॅर्पिओ माॅडेलमध्ये S3+ व्हेरियंट सर्वात स्वस्त गाडी असेल.

महिंद्रा स्काॅर्पिओमध्ये BS6 कंप्लायंट आणि 138 bhp पाॅवर तर, 320 Nm पिक टार्क जनरेट करणारे 2.2 लिटर mHawk डिझल इंजिन असणार आहे. या गाडीची लोकप्रियता पाहता स्वस्तातील स्कॉर्पिओला देखील तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?

धक्कादायक अपघात, …अन् कार थेट विहिरीत कोसळली!

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या