बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारला स्वत: ची चुक कळली”; राज ठाकरेंची ती मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

मुंबई | राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचेे आकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केेलेली एक मागणी मान्य केली आहे.

परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी ठेवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी तसं काही झालं नाही. आता कोरोनाची लाट आली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यामुळे ही लाट ओसरल्यावर मजुर पुन्हा येतील. याच पार्श्वभूमीवर आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, असं उद्धव ठाकरेे म्हणाले.

या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राज ठाकरे जेव्हा सरकारला एखादी सूचना करतात तेव्हा ती महाराष्ट्राच्या हिताचीच असते. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करा अशी सूचना राज ठाकरेंनी केली होती. पण त्याचे राजकारण केलं गेलं. पण आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा सरकारला चुक कळली आणि मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशाप्रकारचे आदेश दिले.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना व्हायरसबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी पोलिसांनी धरला ठेका, पाहा व्हिडीओ

पुणे हादरलं! आई-वडिल मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर 19 वर्षीय तरूणीवर घरात घुसून बलात्कार

‘परिस्थिती गंभीर होत चाललीये, आतातरी काहीतरी करा’; 100 शास्त्रज्ञांचं मोदींना पत्र

कोरोना झाला असतानाही रोहित सरदाना करत होते ‘ही’ महत्त्वाची मदत, शेवटचे तीन ट्विट चर्चेत!

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More