बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं

मुंबई | कोरोनाचा हा राक्षस नष्ट करून माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं आहे. कोकणातील प्रसिद्ध अशा भराडी देवी यात्रेच्या निम्मितानं व्हिडीओ काॅन्फरन्सवर संवाद साधताना ठाकरे बोलत होते. भराडी देवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून ठाकरेंच्या हस्ते सिंधुदूर्गातील महत्वाच्या पाटबंधारे योजनांचा ऑनलाईन भूमिपूजनाचा समारंभही पार पडला.

व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारा संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, आंगणेवाडीची जत्रा म्हणजे कोकणवासीयांचं श्रद्धास्थान असून मी लहानपणापासून भराडी देवीच्या यात्रेबद्धल ऐकत आहे. माझ्या शक्तीचा कण ना कण कोकणवासीयांसाठी आणि राज्याच्या भल्यासाठी वापरला जाऊ दे. माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे.

आपल्या कोकणात पाऊस भरपूर पडत असतो, पूर येऊन अतिवृष्टीही येते. पण सगळं काही संपलं की पाणी समुद्राला जाऊन मिळतं. पाऊसानंतरची उर्वरित सगळी वर्ष कोरडीच जातात. आज या निम्मितानं आपण तीन पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन भूमिपूजन करत आहोत मात्र धरणाच्या उद्घाटनाला मी प्रत्यक्ष हजर असेन, असा शब्दही त्यांनी यावेळेस बोलताना दिला.

दरम्यान जिल्ह्यातील मसुरे-आंगणेवाडी, मालोड-मालडी आणि कुंभवडे या तीन ठिकाणच्या लघु पाटबंधारे योजनांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. योजना कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणल्याबद्धल ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांचं कौतुकही यावेळेस केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कवठेमहांकाळ पुन्हा हादरलं, उपसरपंचाच्या खुनानंतर आता…

…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ

‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More