Top News मनोरंजन

रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज निधन झालंय. रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिलीये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला.”

“दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली,” असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.

रवी पटवर्धन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालंय. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातेय.

महत्वाच्या बातम्या-

ईडीकडून प्रताप सरनाईकांना तिसऱ्यांदा समन्स; 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना

“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात

दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या