Top News महाराष्ट्र मुंबई

‘पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत संबंधितांवर कारवाई करा’; मुख्यमंत्री ‘अ‌ॅक्शन’मोडमध्ये

Photo Credit- Facebook / Sanajy Rathod Twitter / Uddhav Thackeray

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राठोड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. मात्र संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली होती. तेथे झालेल्या गर्दीवरून सध्या सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावीअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यासोबतच त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत सार्वजनिक कार्यक्रम,  धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत गर्दी न करता साजरे करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आज संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रथमच बोलणार असल्याने सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरम्यान, राज्य सरकारने शिवजयंतीला निर्बंध लावले होते आणि नेत्यांच्या राजकीय कार्यक्रमांवर कोणतीही कारवाई नाही. याच पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांवर आज पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीवरून नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती.

थोडक्यात बातम्या-

तरीही सर्वांना पुरून उरले, तो वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच तर ती 23व्या वर्षी उपसरंच बनली!

“मंत्र्यांचे तरूणीसोबत फोटो प्रसिद्ध होऊनही कारवाई नाही, उद्धव ठाकरे शरद पवार गप्प का”

“वाॅर्नरला हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हटवा, त्याचा फिक्सिंगमध्ये सहभाग”

“कॉलर उडवणारे आणि मिशी पिळणारे घरात बसले आहेत”

जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत बंद पण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या