बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

मुंबई | राज्यातील रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने पुन्हा सगळं पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार पुन्हा कडक नर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. यावरून विरोधी पक्षानेते सरकारवर टीका करत आहेत. अशातच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.

डेल्टा विषाणूपासून बचाव की, पळ? असा सवाल करत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहताहेत, अशी टीका अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार असून, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार राज्यात कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातील शिथिलता नसेल. सर्वच जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वर असणार आहेत.

दरम्यान, राज्यात करोनाचे रुग्ण एकीकडे अजूनही 9 ते 10 हजारांच्या घरात असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नवं आव्हान समोर आलं आहे. यामुळे केंद्रानं डेल्टा प्लसचे रुग्ण सर्वाधिक आढळणाऱ्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असल्याचं समजतंय.

 

थोडक्यात बातम्या-

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

“…अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू”

दिल्लीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही, पण… – शरद पवार

“देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी मी भाजपतच राहणार”

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More