बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यायप्रिय असून ते मिस्टर सत्यवादी सुद्धा आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राठोड प्रकरणी भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका आणि विधिमंडळाचे अधिवेशन चालू न देण्याच्या इशाऱ्याला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कोविड संदर्भात अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मांडले गेले पाहीजे यासाठी अधिवेशन झालं पाहिजे. मात्र यादरम्यान अधिवेशन होऊ द्या, गोंधळ नको. पण अधिवेशन होऊच देणार नाही यातला च हा लोकशाही विरोधी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात भाजप आंदोलन करत आहे. मात्र पंतप्रधानांनी आंदोलन न करण्याचा दिलेला सल्ला महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला दिसत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहं. तसेच विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यादरम्यान त्यांनी मर्यादा पाळायला हव्यात, असा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला लगवला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?”

“खुर्ची इतकी वाईट आहे का, की ज्या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

“बेजबाबदार वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?”

“उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं”

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More