बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 25 किलोमीटरसाठी वापरलं हेलिकॉप्टर

नवी दिल्ली | पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी अवघ्या 25 किलोमीटर प्रवासाकरिता हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. यावरून विरोधक चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधत आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी 25 किलोमीटरच्या अंतरासाठी हेलिकॉप्टर का वापरलं? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून 25 किलोमीटर अंतरासाठी हेलिकॉप्टर का वापरलं? यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे की, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे खूप कमी वेळ होता. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. परंतु आता विरोधकांनी हा मुद्दा ताणून धरला आहे.

चरणजीत सिंग चन्नी यांना दिल्लीला जाण्यासाठी मोहाली विमानतळावर जायचं होतं. तसेच चार्टर्ड प्लेनमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला, असंही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानापासून मोहाली विमानतळ 25 किलोमीटर अंतरावर आहे. चरणजीत सिंग चन्नी हे राजींदर निवासस्थान येथून सरकारी हेलिकॉप्टर वापरत मोहोली येथे पोहोचले.

थोडक्यात बातम्या –

नुकसान भरपाईसाठी ठाकरे सरकारकडून मदत जाहीर; पुणे विभागाला मिळणार सर्वाधिक ‘इतक्या’ कोटींची मदत

काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न; बच्चू कडूंवर गंभीर आरोप

चित्रा वाघ यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी; 80 नेत्यांच्या यादीत मिळवलं स्थान

पर्यावरणासाठी एक पाऊल! ‘वन्यजीव सप्ताह’ अंधारबन जंगलमध्ये साजरा

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More