देश

राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या वादात आठवलेंची उडी, म्हणाले…

नवी दिल्ली | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मसुरी येथे आयएएस अकॅडमीच्या समारोपाला जाणार होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारल्याचं समोर आलं.

राज्यपाल मुंबईतून राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहरादून येथे जाणार होते. त्यासाठी राज्य शासनाने चार्टर विमान पूर्व नियोजन करून उपलब्ध करून द्यावं, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं होतं. तरीही राज्य सरकारने विमान उपलब्ध करून दिलं नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारचं वर्तन अतिशय खराब आहे. राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याचा अधिकार आहे. राज्यपालांचा हा अपमान आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची माफी मागावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. संसदेत सुरु असलेल्या अधिवेशनाला रामदास आठवले उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

थोडक्यात बातम्या-

पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

राज्यपालांवर ओढवली नामुष्की; फडणवीस म्हणातात, “इगोवालं सरकार!”

राज्यपाल काही फक्त भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचेही आहेत- संजय राऊत

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंवर ‘ED’ची धडक कारवाई, मुलाला मुंबईला नेलं

परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या