बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू अन् काय देव पावलाय गं”; भाजप प्रवक्त्याचं सरकारवर टीकास्त्र

बीड | महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकान आणि सुपर मॉल येथे वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या स्तरातून टीका होत आहे. भाजपकडून किराणा दुकांनामध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. त्यातच आता भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एका विडंबनाद्वारे राज्यसरकावर टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्रामध्ये तत्कालीन व्यवस्थेच्या आधारावर एक लावणी तयार झाली होती. त्या लावणीचे बोल होते, माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू बाई देव पावलाया गं, आत वर्तमान व्यवस्थेवर विशेषत: मायबाप म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, ठाकरे सरकराने राज्यातील जनतेला, तरूण मुलांना शेतकऱ्यांना दारू प्यायला मिळावी म्हणून किराणा दुकानातून खुलेआम दारूची विक्री सुरू केली आहे, अशी टीका राम कुलकर्णी यांनी केलीआहे.

आनंद झाला माझ्या मनाला सोन्याचा दिसं आलायं गं, मुख्यमंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू न् काय देव पावलाय गं, असं विडंबन करत राम कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर घणाघाती टीका केली आहे. तसेच नाना पटोलेनं दिलीया दारू, न् काय देव पावलाय गं, पवार साहेबांनी पाजलीया दारू काय देव पावलाया गं, असंही राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सदर व्हि़डिओ 1 मिनिट 24 सेकंदाचा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका केली होती. त्यातच आता काही ओळींच्या आधारावर भाजप प्रवक्त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; किरीट सोमय्यांचा खोचक सवाल

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे नाराज, म्हणाले…

“पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत”

“महाराष्ट्रात पुढचे 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही”

हाॅटेलच्या टेरेसवरुन उडी मारत फॅशन माॅडेलचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांना व्हिडीओ काॅल करत म्हणाली….

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More