“मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेनेवर अनेक आरोप करत आहेत. शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यशवंत जाधव यांच्यावर देखील मनी लाँड्रिंगचे धक्कादायक आरोप केले आहेत.
एक रूपयांचा शेअर कोलकत्यातील कंपनीला 500 रूपयांना विकला. 100 कोटींचे शेअर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले. 15 कोटी रूपयांचा फुलप्रुफ घोटाळा प्रधान डिलर्स प्रा.लि. कंपनीने केला आहे. 2012 साली ही कंपनी स्थापन झाली. 15 कोटींचा घोटाळा करण्यात आला, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत.
2020 मध्ये काही लाखांमध्ये ही कंपनी जाधव कुटूंबाच्या नावावर करण्यात आली. यामध्ये 100 कोटींचा अपहार करण्यात आला आहे, असा धक्कादायक आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. घाटकोपर हिंदमाता येथील नालेसफाईच्या कामाचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी बोलताना निल सोमय्यांच्या अटकेवरून महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे. निल सोमय्या यांना जेलमध्ये टाकलं नाही म्हणून हेमंत नगराळेंची बदली करण्यात आली, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. आम्हाला मातोश्रीवरून माहिती येते. सात दिवसांमध्ये कारवाई केली नाही तर पहा मग काय होणार, असं हेमंत नगराळेंना सांगितलं होतं, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Weather Update: पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
“शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात संजय राऊतांचा पुढाकार होता”
“ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था झाली नाही”
“…मग राणेंना अटक झाली तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही?”
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
Comments are closed.