बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आता कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे, असं वैैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट ही भयावह असणार आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची महिती समोर येत आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केलं. कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.

आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेनं आणि जलदगतीनं सुविधा उभारण्याचं काम करत आहेत, याचं समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यादृष्टीनं जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, कोरोना नियंत्रित आला असला तरी गाफिल राहू नका. हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशन विषाणू जलदगतीने पसरत आहे. त्यावर आता आपल्याला मात करायची आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही!

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

रिया चक्रवर्तीच्या ‘रिअल लाईफ हिरो’चा कोरोनाने घेतला बळी

‘गाडी विकून जे पैसे येतील ते आईला द्या, तिची काळजी घ्या’; खडकवासला धरणात उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या

कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णाची दारुपार्टी; बायको-वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धरलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More