बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!

बीड | आई मुलाचं नातं ही खूप जगातली अमुल्य गोष्ट समजली जाते. मुलाने आईसाठी आणि आईने मुलासाठी केलेल्या त्यागाच्या गोष्टी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. अशीच एक घटना बीडच्या जिल्हा रूग्णालयात घडली आहे. आईला मरतेवेळी एकटं सोडून जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुलाने थेट जिल्हाधिकाऱ्याचे पाय धरले.

एक मुलगा त्याची आई कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर तिच्या सोबत रूग्णालयात कोविड वॉर्डमध्ये राहायला आला. तो त्याच्या आईच्या बेड खाली झोपत होता. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हातील कोविड रूग्णालयाला अचानक भेट दिली. पीपीई किट घालून त्यांनी रूग्णालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी जगताप यांनी वार्डात रूग्णांशी गप्पा मारत पाहणी केली. ही पाहणी करत असताना खाटखाली कोणतरी चादर घेऊन झोपलेलं त्यांना दिसलं.

जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना या प्रकरणी सवाल केला. कर्मचाऱ्याने चादर बाजूला केली तेव्हा तिथे एक माणूस झोपलेला दिसला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला विचारपूस केली. त्यानंतर त्यानं जिल्हाधिकाऱ्याचे पाय धरले. माझी आई कोरोना पॉझिटिव्ह आहे. तिचं वय झालं आहे. त्यामुळं ती वाचलं असं वाटत नाही. ती जाणारच आहे, तिच्या शेवटच्या वेळी तिचा मुलगा तिच्यासोबत असल्यावर तिला समाधान मिळेल, असं त्यानं म्हटलं.

ही सर्व हकीकत सांगताना त्यानं हंबरडा फोडला. मला माझ्या आई जवळ राहू द्या अशी विनंती केली. आईवरचं हे प्रेम पाहून जिल्हाधिकारी देखील भरून आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आईजवळ राहण्यास परवानगी दिली. त्यासोबत स्वतःची काळजी घ्या, असं देखील बजावलं.

थोडक्यात बातम्या-

योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”

“अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु”

“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”

उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More