बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?

नवी दिल्ली | आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म ‘यूट्यूब’ नेहमी पुढे  असतं. याच दरम्यान, ‘यूट्यूब’ने युजर्ससाठी एक खूशखबर आणली आहे. आता एका खास फीचरची घोषणा ‘यूट्यूब’ कंपनीने केली आहे. पालक आता मुलांवर ‘यूट्यूब’ कंपनीच्या या फीचरमुळे रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत. आपल्या एका ब्लाॅगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सुरुवातीला बीट टेस्टरसाठी जारी केले जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या माध्यमातून, आपल्या मुलांच्या ‘यूट्यूब’ अकाऊंटपर्यंत पालकांचा अॅक्सेस असेल. त्यामुळे आपली मुले काय बघतात? यावर पालक रेस्ट्रिक्शन लावू शकणार आहेत.

– Explore – त्या मुलांसाठी ही सेंटीग आहे. ज्यांचे वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये ब्लाॅग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हि़डीओज, म्यूजिक क्लिप आणि न्यूजचा समावेश असेल.

– Explore More – 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी ही सेटींग आहे. ही सेटींग इनेबल केल्यावर व्हिवूर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अॅक्सेस करता येईल.

– Most Of You Tube – मुले ‘यूट्यूब’वर जवळपास सर्वच व्हिडीओ या सेंटिंगमध्ये पाहू शकतील. मुले संवेदनशील व्हि़डीओ केवळ Age Restrictions मुळे पाहू शकणार नाही.

थोडक्यात बातम्या – 

‘सरकारने संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या त्या आरोपांना चाकणकरांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या….

तुम्ही मास्क घातलं नाही?; पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं धक्कादायक उत्तर

“मी भ्रष्ट नाही त्यामुळे भाजपवाले माझ्यावर 24 तास टीका करतात”

हरिश्चंद्रानं उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला पण…- अतुल भातखळकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More