बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्ताच्या नात्यानेच फिरवली पाठ! आईला कोरोना झाल्यामुळे मुलाने…

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून अनेक लोक आपला जीव गमवत आहे. अशातच लसीकरण देखील सुरु करण्यात आलं आहे. मात्र या कोरोनाने आता नात्यांमध्ये फुट निर्माण केली आहे. आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुलाने तिला घराबाहेर हकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाही तर यानंतर जे झालं त्याने कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल.

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे एका वृद्ध आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या पोटच्या मुलाने तिला लेकीच्या घरा बाहेर सोडलं. लेकीच्या घरी गेल्यानंतर लेकीने आणि जावयानेदेखील पाठ फरवली आणि घराचा दरवाजा बंद केला. हातबल झालेली वृद्ध महिला अखेर रस्त्यावर राहू लागली. एक चादर पांघरुन घेऊन या माऊलीने अनेक दिवस रस्त्यावर काढले.

उपचार न मिळाल्याकारणानाने महिलेची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तरी देखील ना मुलगा आला ना मुलगी तिला पाहायला आले नाहीत. या महिलेचा एक व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोचला. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लगेच रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यानच माऊलीने आपला प्राण सोडला.

दरम्यान, वृद्ध महिलेची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. तसेच पोलिसांनी महिलेच्या मुलावर आणि मुलीवर दोघांवरही कारवाई सुरु केली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनानी परकी तर लांब आता आपल्या रक्ताची नाती देखील दुरावत असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”

‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार 

नोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

यांच्यापेक्षा गिधाड बरी! वॉर्डबॉयनं मृताच्या बोटाचे ठसे वापरून केलं हे धक्कादायक कृत्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More