बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट; सत्य बाहेर येताच पोलीसही चक्रावले!

यवतमाळ | पोलिसांनी रविवारी रात्री धाड घालून दारव्हा रोड स्थित जसराणा अपार्टमेंटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हे सेक्स रॅकेटचक्क शिकवणी वर्ग घेणारी एका शिक्षिकाच चालवत असल्याची खळबळनजक माहिती समोर आली आहे.

जसराणा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ठाणेदार धनंजय सायरे यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून पाेलिसांनी डमी ग्राहक बनून तेथे पाठवला. सोबतच शासकीय पंचही होते. या डमी ग्राहकाने पाचशे रुपयांच्या तीन नोटा संंबंधित महिलेला दिल्या. त्यानंतर त्या ग्राहकाने दबा धरुन बसलेल्या पोलिसांना सूचना दिली.

घटनास्थळावर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. कुंटणखाना चालवणारी महिला ही शिक्षिका असल्याचं सांगण्यात आलं. तिलाही 17 वर्षांची मुलगी असून ही मुलगी घरात असतानाच देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचं कळतंय.

दरम्यान, पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणारी आणि महिला रामकृष्णराव मस्के याला ताब्यात घेतलंय.

थोडक्यात बातम्या-

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”

विरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा- सतेज पाटील

“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More