बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहराने केला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्टर प्लॅन

नाशिक | नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यातच नाशिक आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. गेल्या 7 दिवसांत नाशिकमध्ये तब्बल 3 हजार 966 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 4 हजार 966 वर जाऊन पोहोचली आहे. शासनाने कोरोना बाबत दिलेल्या नियमांच पालन नागरिक काटेकोरपणे करत नसल्यानं नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे.

देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिकचं नाव आहे. यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे नाशिक महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्टर प्लॅन केला आहे. त्याबाबत शुक्रवारी नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यात नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पालिका आयुक्तांनी आज लगेचच बैठक घेतली होती.

यामध्ये, होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार. कॉमन, कमांड कंट्रोल रूम सुरु केली जाणार. 2 विशेष हेल्पलाईन नंबर जारी केले जाणार. शहरातील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार. 15 दिवसांत पालिकेची बिटको रुग्णालयात सॅम्पल टेस्टिंग लॅब कार्यान्वित होणार, दररोज 2 हजार सॅम्पल तपासणी होणार. नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅब्जकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची तपासणी होणार. निर्बंध न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासन आणि पोलीस यांच्यावर संयुक्त कारवाई करतील. शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार.

दरम्यान, या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी आता कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुख्य सचिवांनी घेतलेल्या बैठकीमुळे नाशिक महापालिका सतर्क झाली आहे. तसच, पुढील काही दिवसांत शहरातील कोरोना परिस्थिती बघितल्यावर नाशिक 100 टक्के लॉकडाऊन करायचं की, नाही याबाबत निर्णय घेऊ असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

“काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाज कधीही पुढे जाणार नाही याची काळजी घेतली”

ब्रेकिंग! दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या कोचला भीषण आग 

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More