बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; बचावकार्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टरची मागणी

रायगड | रायगड जिल्ह्यातील महाडमध्येही पावसाचा कहर सुरूच आहे. पावसाने हाहाकार उडाला आहे. सर्व भागात 8 ते 10 फुटावर पाणी साचलं आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम पाचारण करण्यात आल्या आहेत. बचावकार्यासाठी रायगडच्या निधी चौधरी यांनी हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.

महाड शहरास पूर्ण पाण्याचा वेढा बसलेला आहे. सध्यस्थितीत जोरात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातील पाणीपातळी वाढत आहे. एनडीआरएफच्या टीम पोहोचण्यासही अडचणी येत आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आवश्यक मदत तात्काळ पोहोचवणं शक्य होत नाही. तरी आपल्या स्तरावरुन तात्काळ इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड, हवाई दलाकडील 3 ते 4 हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी रात्रीच उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी निधी चौधरी यांनी केली आहे.

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात महापूर आला असून चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने चिपळूणची अवस्था भीषण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, संगमेश्वर, राजापूर ही शहरेही पुराच्या विळख्यात अडकली आहेत.

दरम्यान, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, वाचा आकडेवारी

‘केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन

आसिफ खान आणि रसिका आडगावकारचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न

‘गरज भासल्यास अमित शहांसोबत बोलणार’; कोकणातील पूर परिस्थितीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया 

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More