बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

मुंबई | येत्या काही दिवसात मान्सुन कोकणात दाखल होणार आहे. त्यामुळे यंदा पाऊस वेळेवर आणि समाधानकारक आहे. आता पावसाळा येणार असल्यानं वातावरण बदलताना दिसणार आहे. कोरोना महामारीचं संकट डोक्यावर असताना आता पावसाळ्यापुर्वी डेंग्यूचा धोका वाढत आहे. दर पावसाळ्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रूग्ण सापडतात. कोरोना आणि डेंग्यूची काही लक्षणं सारखी असल्यानं आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

डेंग्यु हे डासांमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन आहे. ज्यात तीव्र ताप, डोकेदुखी, अंग आणि सांधेदुखी, त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात. डेंग्युचे विषाणू 10 दिवसांपेक्षा जास्त काळ जगत नाही. पण या आजाराकडे लक्ष न दिल्यास जास्त ताप येऊ शकतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. डेंग्यू झाल्यास डाॅक्टरांच्या सल्यानुसार ओआरएस लिक्वीड प्या, भरपूर पाणी प्या, जेवणाची विशेष काळजी घ्या. सूप, काढा, नारळ पाणी, डाळिंब यांचं जास्तीतजास्त सेवन करणं गरजेचं आहे.

भारतात डेंग्यु दोन स्वरूपाचा सापडतो. तो नॉर्मल किंवा गंभीर स्वरुपाचा असतो. डेग्युचा संसर्ग झाल्यास, त्याची लक्षणं 4 ते 5 दिवसांत दिसू लागतात. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू, हाडं आणि सांध्यामध्ये वेदना, उलट्या होणे, मळमळ होणे, डोळ्यांमध्ये वेदना, त्वचेवर पुरळ उठणे, ग्लैंडसमध्ये सूज येणे अशी लक्षणं दिसतात. त्याचबरोबर ओटीपोटात तीव्र वेदना, सतत उलट्या होणे, हिरड्या किंवा नाकातून रक्तस्त्राव होणे, असा त्रासही होतो.

दरम्यान, डेंग्युची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. पुर्ण ब्लड टेस्ट कराव्या लागतात. त्यानुसार प्लेटलेट्स काऊंट करून डॉक्टर उपचार सुरु करतात. डेंग्यू एनएस-1 एजीसाठी एलिसा टेस्ट करावी लागते.

थोडक्यात बातम्या-

“मोदीजी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?”; देशव्यापी मोहीम सुरु

अवघ्या 100 रुपयांसाठी दाम्पत्याने मिळून केली युवकाची हत्या

“मी रोज गोमूत्र घेते त्यामुळे मला अद्याप कोरोना झालेला नाही”

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

वरातीला जाण्यासाठी टमटम भरुन निघाले, रस्त्यात पोलिसांनीच अशी काढली वरात!

मुंबईच्या वेशीवर पोहोचले चक्रीवादळ; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More