बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला दिशा दाखवणारं क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | देशात सहकार क्षेत्राची सुरूवात ही महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची फार मोठी चळवळ उभा करण्यात स्व. गुलाबराव पाटील यांचा वाटा आहे. स्व. गुलाबराव पाटील यांचा आज गुरूवारी जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मुंबईत पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र म्हणल्यावर लढवय्यपण आलं, हिंमत आली, जिद्द आली. देशाला दिशा दाखवणारं क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र आहे. मला सहकारातील जास्त काही कळत नसलं तरी महाराष्ट्राने देशाला सहकाराचा मार्ग दाखवला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्र हे काही लेच्यापेच्या सारखं क्षेत्र नाही, काम नाही की हे बंद केलं, ते बंद केलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना मारला आहे.

केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन असा क्रांतीकारक विचार स्व. गुलाबराव पाटील यांनी केला होता. नाहीतर अनेक जणांना दिल्लीत फक्त उभंच राहावं लागतं. बसायला मिळतच नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना घेतला. बसायची संधी नाकारून मी राज्याची उभारणी करेल. राज्याची अस्मिता ही मोठी आहे. राजकारणाच्या पलीकडे जायला पाहीजे, असा टोला दरेकरांना लगावत नेमकं कुठं जायचं, कसं जायचं, आम्हाला सांगा आमची तयारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

दरम्यान, या जन्मशताब्दी उद्घाटनाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, प्रविण दरेकर, सतेज पाटील, विश्वजीत कदम, शंभुराजे देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

 

थोडक्यात बातम्या –

टी-20 मध्ये कर्णधार रोहित शर्मा असेल पण ‘हे’ दोन खेळाडूही आहेत रेसमध्ये!

गुजरातमध्ये संपुर्ण मंत्रिमंडळच बदललं, विजय रूपाणींच्या सगळ्याच मंत्र्यांना नारळ 

मनसेचं ‘मिशन नाशिक’! राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

विराट कोहलीने ‘या’ 4 जणांशी चर्चा करत घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय!

…अन् नो बाॅलवर माझी विकेट पडली – संजय राठोड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More