बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! प्रशिक्षकाने मॅच अगोदर महिला खेळाडूच्या लावली कानशिलात; टोकियो ऑलिम्पिकमधील व्हिडीओ व्हायरल

टोकियो | सध्या टोकियो ऑलिम्पिक सुरू आहे. अशातच ऑलिम्पिकमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका प्रशिक्षकाने आपल्याच महिला खेळाडूच्या श्रीमुखात लावली आहे. याचा सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील महिला खेळाडूचं नाव मार्टिना ट्राजोस असं आहे. ट्राजोसचा सामना होता आणि त्या मॅचसाठी जात होत्या. तितक्यात त्यांचा प्रशिक्षक येतो आणि थांबवतो. त्यावेळी तो तिच्या कॉलरला पकडून तिला हेंदकाळतो आणि दोन कानशिलात देतो.

हा सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र कोणतीही अफवा पसरवू नये म्हणून ट्राजोस यांनी आपल्या इंन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधील सर्व प्रकार ही एक प्रार्थना असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, कोणत्याही सामन्याआधी ही प्रार्थना केली जाते. यामध्ये प्रशिक्षकाचा कोणताही संबंध नसल्याचं ट्राजोस म्हणाल्या. नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओवरून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तिरंदाजीमध्ये जाधवचं आव्हान आज संपुष्टात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

राज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये!

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

धक्कादायक! पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अभिनेत्रीचा मृत्यू

काळजाचा ठोका चुकवणारी घटना!; विहिरीत पडलेल्या सासूला वाचवण्यासाठी सुनेनं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More