बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘थंडीने गॅसचा दर वाढले’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

वाराणसी | पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत मागील दोन महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर घरगुती गॅसच्या किंमती देखील मागील पाच वर्षांच्या उच्चांकावर आहेत. कोरोनानंतर सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागली. या आर्थिक संकटातून सूटका होत असतानाच केंद्र सरकारने इंधन दरवाढ केली आणि पुन्हा लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र वाढत्या किमतींवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी अजबच दावा केला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एलपीजी सिंलेडरच्या दरवाढीवर वक्तव्य केलं आहे. गॅसच्या किंमतीत थंडीमुळे वाढ झाली आहे. हवामान बदलल्यावर किंमत खाली येतील. ही आंतरराष्ट्रीय बाब आहे. हिवाळा कमी झाल्यावर किंमती देखील खाली येईल, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. हिवाळ्यात मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहेत, असं प्रधान यांना म्हणायचं होतं.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर प्रधान यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रधान बोलत होते. याआधी अहमदाबादच्या एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील इंधन दरवाढीवर वक्तव्य केलं होतं.

यात त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमती धर्मसंकट असल्याचं सीतारामन म्हणाल्या होत्या. यासोबत कधी इंधनाच्या किंमती कमी होतील काही सांगता येणार नाही, असं देखील सीतारामन म्हणाल्या. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सीतारामन यांच्यावर टोला लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

बसा बोंबलत! ‘कंडोम’च्या नादात घालवले तीन लाख रुपये

“संजय राठोडांवर कारवाई करण्याची धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो”

लाॅकडाऊनबाबत विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मनमोहन सिंग नेहमी संकटांचा सामना करायचे, तुम्ही पळ काढत आहात- संजय राऊत

‘पूजाच्या आत्महत्येदिवशी संजय राठोड यांचे 45 फोन कॉल’; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More