बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टोकियो ऑलिम्पिकचा रंगारंग समारोप; वाचा सर्वाधिक पदक मिळवणारे ‘हे’ टाॅप 3 देश

टोकियो | ऑलिम्पिक स्पर्धेला खेळांचा कुंभमेळावा म्हटलं जातं. गेल्या वर्षी कोरोनामुळे रद्द झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानने कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आणून यशस्वीरित्या सुरू करून दाखवल्या आहेत. 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरवात झाली. 16 दिवस खेळाडूंच्या रंजक अशा स्पर्धेनंतर अखेर रविवारी टोकियो ऑलिम्पिकचा समारोप झाला आहे.

भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 7 पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. खेळवण्यात आलेल्या एकूण स्पर्धेत भारताच्या खात्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य तर 4 कांस्यपदकं आली. या स्पर्धेत एकूण 33 खेळांपैकी 18 खेळात भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या 18 खेळात भारतीयांनी 7 पदकं पटकावली आहेत. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने तब्बल 13 वर्षांनंतर भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं.

या स्पर्धेत एकूण 205 देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात अमेरिका, चीन आणि जपान हे तीन देश पहिल्या 3 क्रमांकावर राहिले आहेत. अमेरिकेने या स्पर्धेत 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्य पदकं पटकावली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनने 38 सुवर्ण. 32 रौप्य आणि 18 कांस्य पदक मिळवली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानने 27 सुवर्ण, 14 रौप्य आणि 17 कांस्य पदकं पटकावली आहेत.

दरम्यान, आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत 7 पदकं मिळवली आहेत. याआधी कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदकं मिळवली नव्हती. पुढील ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून आणखी जास्त पदकांची अपेक्षा असेल.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘घरात बसलेलं तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमलं’; लोकलच्या निर्णयानंतर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

इंग्लंडच्या मदतील आला पाऊस, पहिला कसोटी सामना अनिर्णित!

मोठी बातमी! मुंबई लोकलसेवा सुरू, मात्र काढावा लागणार ‘हा’ पास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More