बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

मुंबई | कोरोना महामारीत अनेकांना कोरोनाची बाधा झाली. सुरूवातीच्या काळात कोरोना चाचणीसाठी सर्वत्र चाचणी केंद्र कमी होती. सरकारच्या प्रयत्नातून अनेक ठिकाणी चाचणीची क्षमता वाढवण्यात आली. परंतू, कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे उभारण्यात आलेली केंद्रे देखील अपुरी पडायला लागली. इतरांना बाधा होऊ नये, यासाठी कोरोना रिपोर्ट वेळेवर येणं गरजेचं असतं. यातच आता एका स्टार्टअप कंपनीने एक अनोखं कोरोना चाचणी कीट तयार केलं आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या मदतीने मुंबईतील स्टार्टअप कंपनी पतंजली फार्माने स्वस्तातलं किट तयार केलं आहे. मुंबईत हे रॅपिड अँटिजेन टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. पतंजली फार्माने तयार केलेलं हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर टेस्ट किट आणि रॅपीड अँटिजेन टेस्टसारखंच काम करणार आहे.

मुंबईतील पतंजली फार्मा स्टार्टअपने तयार केलेलं टेस्ट किट खूपच स्वस्त आहे. यासाठी आयआयटी मुंबईची सुद्धा मदत घेण्यात आली आहे. या किटमधून रिपोर्ट तयार होण्यासाठी केवळ 10 ते 15 मिनिटे लागतात. टेस्ट किटची किंमत एका चाचणीसाठी 100 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, पतंजली फार्माचे संचालक डॉ. विनय सैनी यांनी एसआयएनई आणि आयआयटी मुंबईसह स्टार्टअप प्रकल्प सुरु केला होता. आणि त्यांनी 8 ते 9 महिन्यांतच संशोधन प्रयोगशाळा उत्पादन निर्मिती केली होती. या नव्या किटच्या मदतीने अँटिजेन चाचणीला सुरुवात जून 2021 पासून करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण; मागच्या आठवड्यातच घेतली होती लस

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 93 टक्यांवर

“कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही”

कपल रोमान्स करताना होणाऱ्या आवाजाने शेजारी वैतागला, केलं असं काही की….

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More