iPhone वापरणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज!

मुंबई | iPhone वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता जिओने iPhone साठी 5G नेटवर्क सादर केले आहे. त्यामुळे आता iPhone वापरकर्त्यांना हाय स्पीड डेटा मिळणार आहे.

आयफोन 12 आणि त्यानंतरचे सर्व आयफोन वापरकर्ते जिओच्या वेलकम ऑफरसाठी पात्र असणार आहेत. म्हणजेच त्यांना अनलिमिटेड 5G डेटा विनामूल्य प्रवेश मिळणार असल्याचं जिओने सांगितलं आहे.

Apple ने 13 डिसेंबर रोजी भारतीय वापरकर्त्यांसाठी 5G नेटवर्कचा सपोर्ट जारी केला आहे. भारतातील आयफोन वापरकर्ते ज्या भागात त्याचे कव्हरेज उपलब्ध आहे तेथे 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल.

2020 किंवा नंतर लाँच झालेल्या सर्व iPhones वर आता 5G वापरता येणार असल्याचं जिओ कंपनीने जाहीर केलं आहे.

दरम्यान, Jio True 5G हे Apple च्या iPhone 12 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेलमध्ये वापरला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More