बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! फक्त 3 मिनिटात तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

नवी दिल्ली | कोरोना महामारीचा (Corona) जगावर प्रचंड मोठा नकारात्मक परिणाम (Negative Effect) होताना आपण पाहिला आहे. कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षात अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सर्वांनाच फटका बसला आहे. व्यावसायिक क्षेत्रात असेल वा अन्य कोठेही नोकरकपातीचा (Dismissal decision) निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. अशातच आता एक नोकरकपातीची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्यानं ऑनलाईन मिटींग (Online Meeting) चालू आहेत. न्यूयाॅर्कमधील एका कंपनीच्या सीईओंनी आपल्या कर्मचाऱ्यांची झुम मिटींग बोलावली. भारतीय वंशाचे विशाल गर्ग यांनी आपल्या मिटींगमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना बोलावलं व फक्त तीन मिनिटामध्ये तब्बल 900 कर्मचाऱ्यांना कारण न सांगताच काढून टाकलं आहे.

विशाल गर्ग हे बेटर काॅम या कंपनीचे सीईओ आहेत. या कंपनीत जपानमधील एका बॅंकेची गुंतवणूक आहे. या कंपनीचं सध्याचं बाजारमुल्य तब्बल 7 अब्ज डाॅलर इतकं आहे. कर्मचाऱ्यांना मिटींगमध्ये एक गुलाबी कलरचा कागद देण्यात आला ज्या कागदाचा असा संकेत होतो की, कामावरून कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. अशा रितीनं कर्मचाऱ्यांना काही शुल्लक कारणावरून काढल्याचं समजलं आहे.

दरम्यान, सध्या विविध आयटी कंपन्या कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांना आता नव्या संधीच्या शोधात जावं लागणार आहे. गर्ग यांनी कंपनीच्या हिताचा निर्णय घेतल्याचं सांगतिलं आहे. कंपनीनं पहिल्यांदाच तब्बल 15 टक्के इतकी कर्मचारी कपात करण्याचा धाडसी निर्णय  घेतला आहे.

थोडक्यात बातम्या 

सुप्रिया सुळे म्हणतात,”माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की…”

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंच्या भेटीला; समोर आलं ‘हे’ कारण

omicron हवेतून पसरतोय?; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

‘…हे कदाचित कोरोना संपल्याचं लक्षण असेल’; आनंद महिंद्रांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More