बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बच्चु कडुंची संकल्पना ऐतिहासिकच नाही, तर शेतकऱ्यांना समृद्धी देणारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील 600 किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचं तोंडभरुन कौतुकही केलं. शेत शिवारातील पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांसाठी कळीचा प्रश्न असल्याने त्याची तीव्रता जाणून बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यात पाणंद रस्त्याचं जाळं तयार करण्यासाठी प्रयत्न केले ही संकल्पना ऐतिहासिकच नाही तर शेतकऱ्यांना समृद्धी देणारी ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात 600 किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उद्घाटन केलं. बच्चू कडू यांनी त्यांच्या आमदार निधीतून 1 कोटी 44 लाख 43 हजार 560 रुपये निधी या कामासाठी दिला आहे. या व्यतिरिक्त पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून 5 कोटी 60 लाख रुपये तसेच मनरेगातून 4 कोटी 2 लाख रुपये निधी पाणंद रस्त्यांसाठी मिळवून देण्यात आला आहे.

600 किलोमीटरच्या पाणंद रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यात पाणंद रस्त्यांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासनही दिलं आहे. शेतमाल बाजारपेठांपर्यंत नेणे सोयीचे होण्यासाठी ग्रामस्थ, मंडळस्तर आणि तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

त्रिस्तरीय समिती निर्माण करण्याचा निर्णय होताच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना तिन्ही स्तरावर पुरस्कार दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांचा यात सहभाग वाढावा आणि पाणंद रस्त्यांची कामे जलद गतीने व्हावी तसेच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावी यासाठीच या योजनेचा पाया रोवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी या योजनेचे कौतुक करुन पाणंद रस्ते ही एक लोकचळवळ म्हणून उभारण्यात यावी अशी मागणीही सर्वांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

थोडक्यात बातम्या –

मुलीवर बलात्कार… बापानं असा घेतला बदला की काळजाचा थरकाप उडेल

महिन्याभरात कोरोना काय रुप घेईल?; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा

“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”

महाराष्ट्रातील निर्बंध आणखी कडक होणार; सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही?

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू! मंदिरातून येताना दोन मुलींसोबत झालं मन हेलावून टाकणारं कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More