बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस पक्ष काढणार ‘इतक्या’ हजार किलोमीटरची यात्रा

नवी दिल्ली | आगामी काळात होणाऱ्या उत्तर प्रदेशतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष निवडणुकीची जोरदार तयारीला लागल्याचं सध्या चित्र दिसत आहे. काँग्रेस पक्षाने देखील या निवडणुकीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली 12 हजार किमीची यात्रा काॅंग्रेस काढणार आहे. या संबंधित काँग्रेस पक्षाकडुन अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.

प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या यात्रेच नाव ‘प्रतिज्ञा’ काॅंग्रेसकडून देण्यात आलं आहे.  ही यात्रा उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गावामधून जाणार असल्याचं नियोजन काॅंग्रेस पक्ष करत आहे. त्याचबरोबर या यात्रेत ‘हम वचन निभायेंगे’, अशी घोषणा देण्यात येणार आहे. या संबंधित निर्णय प्रियंका गांधी यांच्या संमतीने काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.

उत्तरप्रदेश मध्ये प्रियंका गांधी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सध्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.  या ठिकाणी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी गांधी आढावा बैठक घेत आहेत. तसेच प्रियंका गांधी सर्व स्तरातुन माहिती घेत असून निवडणुकीची रणनिती आखत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, काॅंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या  प्रतिज्ञा यात्रेचा मार्ग अजुन निश्चित करण्यात आला नाही आहे. त्यासंबंधित काँग्रेस नेत्यांकडुन सुचना मागवण्यात येत आहेत. त्यानुसार या यात्रेची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं काॅंग्रेस पक्षांनी सांगितली आहे.

थोडक्यात बातम्या-

“नारायण राणे यांना उंचीवरून काय बोलणार?”

अर्जुना तया नाव दान, जे का अंजनाचे निधान! दगडूशेठला तब्बल ‘इतक्या’ किलो सोन्याचा मुकूट अर्पण

“राज्यात भाजपचं सरकार यावं ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील”

काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही- देवेंद्र फडणवीस

इंग्लंडचा रडीचा डाव! भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात पुन्हा नवा ट्विस्ट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More