बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काॅंग्रेसने मला सेक्युलरिझम शिकवू नये, नाना पटोले आणि रेवंथ रेड्डी सारखे नेते…”

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार असल्याचं बोलण्यात येत होतं. मात्र त्यांनी मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. अलिकडेच अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेशी झालेली युती आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारखे भाजपमधून काॅंग्रेसमध्ये आलेले सेक्युलरिझमवर बोलणारं कुणीही नाही. त्यामुळे सेक्युलरिझमवर बोलणं सोडून द्या रावतजी. तसेच नाना पटोले आणि रेवंथ रेड्डी हे स्वयंसेवक संघातून काॅंग्रेसमध्ये आले आहेत, असं बोलून अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्यावर हल्ला चढवला.

अमरिंदर सिंग यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे अमरिंदर सिंग हे भाजपचा मुखवटा बनत आहेत. काॅंग्रेस पक्षाने त्यांचा अपमान नाही तर सन्मानच केला आहे. असं हरीश रावत म्हणाले होते.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून काॅंग्रेसने निवड केली होती. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी देखील काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी काॅंग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून आली आहे.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली – नाना पटोले

वर्ल्ड चॅम्पियन! डीजे ब्रावोच्या गाण्यावर थिरकले कॅरेबियन खेळाडू; पाहा व्हिडीओ

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More