मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले अॅकशन मोडमध्ये आले आहे. काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षा पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्यानंंतर महाविकासआघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसला राज्यात पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याचा फायदा घेत काँग्रेसने आता राज्यात पक्षविस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई, कल्याण डोंबवली, वसई विरार, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकदिलाने काम करा. काँग्रेसपक्षाला विजयी करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
सध्या काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे. काँग्रेस पक्षाला माननारे राज्यात अनेक लोक आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांपर्यत पोहचलं पाहीजे. पक्ष संघटना वाढवण्यासाठी मायक्रो लेवलवर काम करा. स्वबळावर लढण्यासाठी तयार रहा. लवकरच महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे कामाला लागा, असं नाना पटोले म्हणाले.
पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमात सहभागी करण्याची गरज आहे. त्यांना सोबत घ्या. काँग्रेसने समाजातील सर्व घटकांसाठी काम केलं आहे. यावेळी चांगलं काम केलं तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.
चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काही अडचणी मांडल्या व काही सुचनाही केल्या. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन पक्ष त्यांना सोबत असल्याचा विश्वास दिला.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 24, 2021
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील”
मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?
संजय राठोडांचा पाय खोलात, पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल
त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!
आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी!
Comments are closed.