बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा नामंजूर

नवी दिल्ली |  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून काँग्रेस वर्किंग कमिटीकडे आपला राजीनामा सोपवला होता. मात्र वर्किंग कमिटीने त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

आज दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन करण्यासाठी बैठक पार पाडली. यावेळी पराभवाची जबाबदारी स्विकारत राहुल यांनी आपला राजीनामा समितीपुढे ठेवला. मात्र तुमच्या नेतृत्वाची काँग्रेसला गरज आहे, असं काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल यांना सांगितलं.

सध्याच्या आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत राहुल गांधी यांचं काँग्रेस पक्षाला उभारी देईल, असं कार्यसमितीने म्हटलं आहे.

दरम्यान, पक्षात मोठे बदल करण्यासाठी राहुल गांधी यांना सर्वाधिकार आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला

-राहुल गांधींच्या ‘या’ कृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली

-नारायण राणेंचं काँग्रेस प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य

-मस्ती अंगलट आली!; या दोन आमदारांसह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

-नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेेशाबाबत हर्षवर्धन पाटील म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More