बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूरग्रस्तांचे सांत्वन हा तर मुखवटा; फडणवीसांच्या दौऱ्यावरून संजय राऊत म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावरूनच आता सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

फडणवीस यांनी पोटनिवडणूक लागलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच ‘पूरग्रस्तांचे सांत्वन हा मुखवटा आणि राजकारण हा त्यामागचा लपलेला चेहरा होता का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं मागच्या वर्षी दु:खद निधन झालं होतं. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. त्यातच फडणवीस रविवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर नुकसानीची पाहणी करत असताना त्यांनी शिवसेनेचा नेता गळाला लावला, असा घणाघात राऊतांनी केला आहे. कट्टर शिवसैनिक असलेले आणि शिवसेनेच्या तिकीटावर 3 वेळा आमदार झालेले सुभाष साबणे यांनी काल शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा करून टाकली. त्यानंतर त्यांना आता भाजपकडून आता देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे.

काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडत असल्याचं स्पष्टीकरण साबणे यांनी दिलं. पण आता येणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही निवडणुक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची होणार यात काही शंका नाही.

थोडक्यात बातम्या

देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं, तीन जण जखमी

धक्कादायक! शिवसेना कार्यकर्त्यांनी केली युवासेना पदाधिकाऱ्याला मारहाण

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह ‘या’ सात जणांना तुरूंगाची हवा!

आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात खराब बॉल, धोनीही झाला थक्क, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More