बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला – ॲड. गुणरत्न सदावर्ते

नवी दिल्ली | मराठा समाजाच्या गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेली मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय आहे, अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेलं हे आरक्षण अवैध असल्याचं सांगितलं.

या सर्व प्रकरणात आरक्षण विरोधी याचिका दाखल केलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आनंद व्यक्त करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘भारतीय संविधान आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला’.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू होतं. तसेच राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 26 एप्रिलला न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवत 5 मे रोजी सकाळी 10:30 वाजता अंतिम सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

मराठा आरक्षणाची तुलना गुणरत्न सदावर्ते यांनी वायरसशी करून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हा अल्ट्रा व्हायरस आहे, असं म्हटलं असल्याचं सांगितलं. त्याबरोबरच इंद्रा सहानी खटल्याच्या अनुषंगानं पुन्हा विचार करण्याची गरज नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

थोडक्यात बातम्या –

चिंता वाढली! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

उर्वरित आयपीएल ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता; ब्रिजेश पटेल यांचं सुचक वक्तव्य

“हम लाॅकडाऊन का पालन करेंगे” सकाळी व्यायामासाठी निघालेल्या लोकांचा पोलिसांनी काढला घाम

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस – संभाजीराजे भोसले

मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More