बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज!

नवी दिल्ली | दोन आठवड्यांपूर्वीच एका कॉकटेल अँटिबॉडीज औषधाला भारतात मान्यता देण्यात आली. मोनोक्लोनल अँटिबॉडीने उपचार केल्यानंतर 12 तासांतच कोरोना रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचं समोर येत आहे.

कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब या मोनोक्लोनल अँटिबॉडी औषधानं कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून पहिल्या सात दिवसांतच त्यांच्यातील लक्षणं वेगानं कमी झाली आणि औषधाचा चांगला परिणाम दिसून आला, असं सर गंगाराम रुग्णालयानं सांगितलं आहे.

रॉशे इंडिया आणि सिप्लानं 24 मे, 202 रोजी भारतात हे औषध लाँच केलं. अमेरिकेनंतर भारतातही याच्या आपात्कालीन वापरास परवानगी मिळाली आहे. सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना हे औषध देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, 36 वर्षाच्या आरोग्य कर्मचाऱ्याला भरपूर ताप, खोकला, अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना होत्या. त्याला आजाराचं निदान झाल्यानंतर सहाव्या दिवशी त्याला मोनोक्लोनल अँटिबॉडी औषध देण्यात आलं. अवघ्या 12 तासांतच त्याची प्रकृती सुधारली आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला, असं रुग्णालया प्रशासनानं सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

घरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा!

“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा

“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More