बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! ‘या’ वर्षात कोरोना नष्ट होणार; WHOच्या संशोधकांचा दावा

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र कोरोनाच्या विषाणूचे वेगवेगळे व्हेरियंट समोर येत असल्यामुळं तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशातच Omicron मुळे जगाचं टेंशन वाढल्याचं दिसतंय. मात्र, आता दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात तब्बल 54 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता लवकरच जग कोरोनामुक्त होणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं आहे. येत्या वर्षभरात म्हणजेच 2022 मध्ये कोरोना महामारी संपुष्टात येईल, असं भाकित WHO ने केलं आहे.

सध्या ओमिक्राॅन व्हेरियंटचा मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसत आहे. तरीदेखील 2022 पर्यंत मृत्यू होण्याची संख्या शून्यावर येईल. तोपर्यंत कोरोना समुळ नष्ट होणार नाही. पण ही महामारी राहणार नाही. त्यानंतर ती सर्दी ,खोकला, ताप यांसारख्या  नार्मल आजारांसारखा होईल, असं देखील संशोधनातून समोर आलं आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार महिन्यात कोरोनावरील औषध बाजारात येईल. त्यामुळे आगामी काळ हा महत्त्वाचा असेल. त्यामुळे जग मास्क फ्री होईल, असंही WHO ने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! Omicronवर प्रभावी ‘या’ गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

धक्कादायक! ‘या’ देशानं 11 दिवसांसाठी घातली हसण्यावर बंदी

‘बलात्काराचा आनंद घ्या’; म्हणणाऱ्या काॅंग्रेस नेत्यानं मागितली जाहीर माफी

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More