बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! कोरोना हवेतून पसरतोय; परिस्थिती आणखी गंभीर होणार

नवी दिल्ली | कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्वच देश हतबल झाले आहेत. भारतात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लॅन्सेटने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे एकच खळबळ माजली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार हा हवेतून होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने रुग्णसंख्या वाढवत असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कोरोना हवेतून पसरत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध तर काही राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनावर रिसर्च करणाऱ्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार एक व्यक्ती 53 जणांना कोरोनाविषाणू पोहोचवतो, असं निरीक्षण करण्यात आलं आहे. तज्ञांनी केलेल्या निरीक्षणात एक व्यक्ती कुठेही हात लावण्यास गेली नाही किंवा कोणाच्या संपर्कातही आली नाही, तरीही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोना हा हवेतून पसरत असल्याचं तज्ञांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.

कोरोना जर हवेतून पसरत असेल तर सोशल डिस्ट्न्सिंग आता पुरेसं नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर भविष्यात आणखी ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाविषाणू हवेतून पसरत असल्याचं सहा तज्ञांच्या समितीने म्हटलं असून यामध्ये इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामधील तज्ञांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या

उस्मानाबादेत एकाच वेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

भारतासाठी धोक्याचा इशारा, दररोज होऊ शकतो 2320 जणांचा मृत्यू

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महाराष्ट्र सरकार करणार मेगाभरती

कोरोनामुळे घरीच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांमध्ये सर्वाधिक घटना

पुण्यात कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More