नवी दिल्ली | भारतात कोरोना संक्रमणाचा वेग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या चोवीस तासात कोरोना रूग्णसंख्येने 80 हजाराचा आकडा गाठला आहे. तर दररोज होणाऱ्या मृत्युदराचा आकडा हा आता 500 वर पोहचला आहे. मागील काही काळातील भारतातील कोरोना उद्रेक पाहता देशात लवकरच कोरोना विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील 15 ते 20 दिवसांत रोज 80 हजार ते 90 हजारांनी रूग्णसंख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. तर एवढंच नाही तर ही रूग्णसंख्या आणखी वाढणार असून 1 ते 1.5 लाखांवर देखील पोहचू शकते. यामुळे देशात आणखी मोठ्या प्रमाणात कोरोना विस्फोट होण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांनंतर यात घट होऊन रूग्णसंख्या कमी होणार आहे, अशी माहिती आयआयटी कानपूरचे तज्ज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 43 हजारांवर रूग्णसंख्या पोहचली आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या बैठका घेतल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र लसीकरण मोहीमेची संख्या वाढवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. गुरुवारी 43183 नवीन रुग्णांची नोंद झाली.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पठ्ठ्या एक लाख रूपये किलोनं विकतोय ‘ही’ भाजी; वाचा देशात कुठे होतंय उत्पादन
लग्नाच्या दीड महिन्यानंतर बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज!
BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर
धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.