बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! ओम, ओम म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह अन्….

नवी दिल्ली | एखाद्या मानवी देहातून त्याचा प्राण गेल्यावर त्या देहाचा अंत्यविधी करतात. मात्र
अंत्यसंस्कार करताना मृतदेह चितेवर ठेवला असताना त्या मृतदेहाने काही हालचाल किंवा काही शब्द उच्चारले तर आपला जीव हातात येईल. अशा प्रकारचा सीन तुम्ही चित्रपटात पाहिला असेल पण जर प्रत्यक्षात असं काही झालं तर विचार केला तरी अंगावर काटा येतो. मात्र असं प्रत्यक्ष घडलं आहे.

मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यात गुरुवारी एका मृतदेहाला स्मशानात नेण्यात आलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होेते मात्र अचानक त्या मृतदेहातून आवाज येऊ लागला होता. म्हणजेच तो मृतदेह बोलत होेता इतकंच नाही तर त्यानंतर तो चितेवरच उठून बसला. अनिल जैन असं संबंधित मृत व्यक्तिचं नाव होतं.

अनिल जैनला कोरोनाची बाधा असल्याचं सांगितलं.  जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर 15 दिवस उपचार करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. जेव्हा त्याला स्माशनभूमीत नेलं तेव्हा त्याच्या शरीराची हालचाल झाली. ओम, ओमचा आवाजही ऐकू आला आणि तो उठून बसला, असं मृताच्या भावाने सांगितलं.

मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला. त्यांनी ती व्यक्ती मृत असल्याचं सांगितलं. पण नातेवाईक ऐकायला तयार नाहीत. म्हणून ते पुन्हा मृतदेह घेऊन जिल्हा रुग्णालयात गेले. तिथं त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तो मृत आहे असेच सांगण्यात आलं. याबाबत आज तकने वृत्त दिलं आहे. रूग्ण रूग्णालयात जिवंत असल्याचा आरोप नातेवाईकांनी रुग्णालयावर आरोप केला पण डॉक्टरांनी आरोप फेटाळून लावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?- देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला चंद्रकांत पाटलांनी भरला दम; म्हणाले, औकातीत रहावं…

‘कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार’; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

“भारत हिंमत हरलेला नाही, तुम्ही ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहात त्याची जाणीव आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More