बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय निवडणूक आयोगाचाही काँग्रेसला दणका, मतमोजणीला सुरूवात

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावत केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय कळवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानंही काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांच्या मतांवरून आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणीला देखील उशीर झाला. केंद्रीय निवडणूक आयोग्याच्या निर्णयानंतर अखेर मतमोजणीला सुरूवात झाली असून थोड्याच वेळात निकाल समोर येतील.

दरम्यान, 5 वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीला तब्बल दोन तासांनी सुरूवात झाली. त्यात भाजप व महाविकास आघाडी दोघेही विजयाचा दावा करत असल्याने विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”

भाजपच्या ‘या’ दोन मतांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

‘राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर…’, दीपाली सय्यद यांची तुफान टोलेबाजी

अग्निवीरांसाठी सर्वात मोठी घोषणा, आता ‘इतका’ पगार मिळणार

‘…त्यामुळे शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार’, रवी राणांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More