बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळालंय’; भाजप प्रवक्त्याचा जावईशोध

नवी दिल्ली | स्वातंत्र्य अमृत महोत्सव संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. त्याकरिता देशात अनेक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यातच आता देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर मिळाले आहे, असं अजब वक्तव्य भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रवक्ता रूची पाठक यांनी  केलं आहे. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर मिळाले आहे या वक्तव्यामुळे रूची पाठक यांना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. लल्लन टाॅपच्या एका मुलाखतीत काँग्रेस पक्षाबद्दल बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.काँग्रेसला पुर्ण स्वातंत्र्यही मिळवता आले नाही. आपल्याला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळाल असल्याचं रूची पाठक म्हणाल्या आहेत.

ब्रिटीश क्राऊनने भारताला 99 वर्षांच्या भाडेकरारावर स्वातंत्र्य दिले आहेत. याला काँग्रेस जबाबदार आहे. यावेळी रूची पाठक यांनी पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांचं नाव घेतलं आहे. स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं तेव्हा पंडित नेहरू आणि महात्मा गांधी नेतृत्व करत होते. तेव्हा ब्रिटीशांना भारताला स्वातंत्र्य द्यायचे नव्हते. त्यावेळेस निवडणुका नसल्याने नेहरू आणि गांधीजी यांनी ब्रिटीश क्राउनची शपथ घेतली होती. याकारणामुळे आज मिळालेलं स्वातंत्र्य  भाडेकरारावर आहे, असा दावा रूची पाठक यांनी केला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यासंबंधीच्या दाव्यावरून काही नेटकऱ्यांनी रूची पाठक यांना व्हाॅट्स अॅप विद्यापीठाच्या  प्रोफेसर, असं म्हणत ट्रोल केलं आहे. रूची पाठक यांच्या दाव्यावरून कोणताच भाजप नेता याविषयी बोलत का नाही? त्यावरून मी पुरावे सादर करू शकते,असं रूची पाठक म्हणाल्या होत्या.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या- 

“त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर…”

“महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भगवा फडकवणारच”

दिवाळी सुट्ट्या जाहीर! राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या

मोदी सरकारचा मोठा निर्णय! समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा

रणबीर-आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार? शुटिंग थांबवल्याने चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More