बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात कोणत्याही गोष्टीचा उत्सव साजरा करण्याचा नवीन पायंडा पडलाय”

मुंबई | जगभरात कोरोना महामारीने गेल्या दोन धुमाकूळ घातला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा वाटा आहे. भारतानं कोरोना लसीकरणामध्ये नवीन विक्रम रचला आहे. देशातील नागरिकांना आतापर्यंत 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देऊन पूर्ण झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशातील 100 कोटी कोरोना लसीकरणाच्या विक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.

100 कोटी कोरोनाचे डोस पूर्ण झाले असतील तर आनंदची गोष्ट आहे. जगात आपला देश डोस देण्यामध्ये 19व्या स्थानावर आहे. पण यासंदर्भात मी वेगवेगळे आकडे बाहेर येत आहेत. काहीजण म्हणतात की, 33 कोटीच दोन डोस झाले आहेत. तर काही लोकांना दुसरा डोस मिळालाच नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं, की या देशात एक नवीन प्रथा पडली आहे. पायंडा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्सवात आपण सहभागी होऊया. 100 कोटी कोरोना डोस मिळाले नाहीत तर फक्त 33 कोटी लोकांनाच कोरोना लसींचे डोस मिळाले आहेत. त्यामुळं फक्त सरकार उत्सव साजरा करत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी म्हटलं आहे की काही लोकांना डोस मिळाले नाहीत. तर फक्त उत्सवबाजी चालू आहे. तसेच 100 कोटी डोस झाले असतील तर आनंदाची बाब आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More