बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अविवाहित लोकांच्या हातात देश आहे आणि ते…’; नवाब मलिकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई | मुलींच्या विवाहाचं वय (Marriage Age) वाढणार असल्याच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र काल अखेर याविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आणि पुरूषांच्या लग्नाच्या वयामध्ये समानता आणण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधायक मांडलं जाणार असल्याची शक्यता आहे. अशातच आता या मुद्द्यावरुन राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘असं तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करतंय? कारण अविवाहित लोकांच्या हातात देश आहे. आणि लग्नाविषयी ते गंभीर नाहीत’, असं म्हणत नवाबांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे मलिक यांनी म्हटलं की, कोणत्याही सज्ञान व्यक्तीला आपल्या विवाहाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्या परवाणगीशिवाय देशात कोणताही विवाह होऊ शकत नाही.

दरम्यान, 18 वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. 18 वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केलं जातं. लग्नासाठी महिलांचं वय 21 झालं, तर मग पुरुषांचं वय 25 केलं जाईल का? पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर असायला हवं, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

चिंताजनक: महाराष्ट्र राज्य ठरतंय Omicronचं हाॅटस्पाॅट

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही”

येत्या 3-4 दिवसांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

बाळा नांदगावकर मनसे सोडणार???, नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More