बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही, असं वक्तव्य शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

पेगॅससवर चर्चा व्हायला हवी. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. पण सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर देश सरकारच्या हातात सुरक्षित नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे.

पेगॅससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांनी तिथे असण्याने फरक पडत नाही. पंतप्रधानांनी ते ऐकलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सरकारला पेगॅससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. विरोधी पक्षांकडून त्यांना ते ऐकावं लागेल त्याच्याबाबत सरकारला धास्ती आहे. पण सत्ताधाऱ्यांनी सत्य ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे. विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत बंधनकारक असलं तरी केंद्र सरकार याबाबत सतत माघार घेताना दिसतंय, असं राऊतांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

आज शंभरावं वर्ष लागतंय, आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही- बाबासाहेब पुरंदरे

‘बँक बुडाली तर…’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More