बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला नव्या पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. या सर्व परिस्थितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.

देशाला नव्या पंतप्रधानांची गरज आहे, असं म्हणत स्वरा भास्करने पंतप्रधान बदलण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे स्वरा भास्करला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.

द प्रिंट वृत्तपत्राचे शेखर गुप्ता यांनी सरकार विरोधात ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनासाठी नवीन यंत्रणा आणण्याचा सल्ला दिला होता. शेखर गुप्ता यांचं ट्विट रिट्विट करत स्वराने भारताला एका नव्या पंतप्रधानांची गरज आहे. जर भारतीयांना त्यांच्या प्रियजनांना असं ऑक्सिजनसाठी तडफडून मरताना पाहायचं नसेल तर, असं म्हटलंय. स्वराच्या या ट्विटनंतर ट्विटरवर #SwaraBhaskar हा हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे.

दरम्यान, याआधी पश्चिम बंगाल मधील मतदानाच्या निर्णयावर बंगालमध्ये 70 टक्के हिंदू आहेत. हिंदूंनी तुम्हाला लाथ मारून हाकलंय, असं म्हणत स्वराने भाजपवर निशाणा साधला होता. तसेच स्वरा नेहमी देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर रोखठोक भाष्य करताना दिसते.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ ठिकाणी लॉकडाउन करा; मुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना

भाजपने माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे सोपवली ही मोठी जबाबदारी

“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक”

काय सांगता! हनीमूनच्या रात्री नवरदेवाला खोकणं पडलं महागात, नवरीने केलं असं की….

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More