बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

SBI सारख्या चार ते पाच मोठ्या बॅंकांची देशाला गरज- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली | भारतीय बॅंक संघाची 74 वी सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढत्या गरजांबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. SBI सारख्या चार ते पाच मोठ्या बॅंकांची भारताला गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी यावेळी म्हटलं आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भविष्यातील आवाहनांचा विचार करता आपल्याला अधिक बॅंकांची गरज नाही तर मोठ्या बॅंकांची गरज आहे. देशातील वाढत्या आणि बदलत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी बॅंकिंगला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. भारतामध्ये चार किंवा पाच एसबीआयची गरज असेल.

भारतीय बॅंकिंग तात्काळ आणि दिर्घकाळामध्ये कसे असेल, या गोष्टीबद्दल बॅंकिंग क्षेत्राने विचार करणे गरजेचं आहे. बॅंकिंग क्षेत्र आता बऱ्यापैकी डिजिटल प्रक्रियांच्या माध्यमातून संचलित होणार आहे, असं देखील सीतारामन यांनी या बैठकीत म्हटलं आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी या बैठकीमध्ये बॅंकर्सना युपीएला महत्व देण्याचे आणि त्याला मजबूत करण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच देशातील ज्या भागात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात त्यातील काही भागात अद्याप बॅंका नसल्याची चिंता यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“…नाहीतर ओवैसींना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचं अंगवस्त्र म्हणून पाहिलं जाईल”

चिंताजनक! कोरोनामुळे कुपोषणाचा धोका वाढलाय, डाॅक्टरांचा गंभीर इशारा

“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

“बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More