बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशाला माझी गरज आहे, मला दारू आणायला जाऊ द्या”

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केजरीवाल सरकारनं वीकेण्ड कर्फ्यू लागू केला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पण या नियमांचं अनेक लोक पालन करताना दिसत नाहीये.

अनेक जण गरज नसताना बाहेर पडत आहेत. वीकेण्ड लॉकडाऊन असल्यानं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांनी नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. नियम मोडणाऱ्यांना पकडून पोलीस त्यांच्याकडून दंड आकारत आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं असता ते एकापेक्षा एक कारणं देताना दिसत आहेत.

दिल्ली पोलीस विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करत होते. यावेळी एका व्यक्तीला पोलिसांनी हटकलं. पोलिसांनी घराबाहेर कशासाठी पडला? असं विचारलं. यानंतर या व्यक्तीने पोलिसांना अजब उत्तर दिलं आहे.

मी दारू आणायला जात आहे. माझा देश संकटात आहे. त्यामुळे मी दारू आणायला निघालो आहे. यामुळे सरकारला महसूल मिळेल, असा युक्तीवाद या व्यक्तीनं केला. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून दंड आकारला आणि त्याला घरी जाण्यास सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचं फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलंय का?”

कुऱ्हाडीने वार करत अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्री; बारामतीतील धक्कादायक प्रकार

कोरोना खरंच हवेतून पसरतो का?; आयसीएमआरच्या माजी संचालकांचा महत्वाचा खुलासा

“मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More