बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! शनिवारी देशात गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोना च्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी देशातील नव्या कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

शनिवारी देशात 1 लाख 20 हजार 529 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर शनिवारी 1 लाख 97 हजार 894 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 3380 कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 44 हजार 082 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 15 लाख 55 हजार 248 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 86 लाख 94 हजार 879 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 22 कोटी 78 लाख 60 हजार 317 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ 

हळद ते मिरवणुकीपर्यंत तरुणाच्या डान्सने घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण देऊन अशोक चव्हाण यांचा राजीनामा 5 जुलैपर्यंत घ्या, नाहीतर…”

खुशखबर! ‘हा’ अपवाद वगळता प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

‘लस घ्या आणि मिळवा मोफत बिर्याणी’; ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी योजना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More