बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात आपले हातपाय पसरवले आहेत. संपूर्ण जगाला या व्हायरसनं हैराण करुन सोडलं आहे. त्यातच आता कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. अशातच अभ्यासातून दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पुढील भविष्यात देश कोरोना महामारीपासून मुक्त होणार नाही. कोरोना महामारी ही कायम राहील. स्थानिक पातळीवर जर कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर ही लाट कोरोनाचं तिसरं रुपही धारण करण्याची शक्यता आहे. मात्र या लाटेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेएवढी परिस्थिती गंभीर होणार नाही, असं देशातील व्हायराॅलाॅजिस्ट डाॅ. गगनदीप कांग याचं म्हणणं आहे.

प्रिटर या वृत्तसंस्थेची बोलताना डाॅ. गगनदीप यांनी म्हटलं की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येला संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही भागांमध्ये संसर्ग वाढत जाऊ शकतो.

दरम्यान, सणासुदीच्या काळात गर्दीमुळे कोरोना संसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट लवकरच येऊ शकते. नागरिकांनीही लसीकरण लवकरात लवकर करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More