देश

देश अशा अहंकाराला माफ करणार नाही; प्रियांका गांधींचा पुन्हा मोदींवर पलटवार

चंदिगड | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केलेल्या टीकेला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मोदींना ‘अहंकारी’ म्हणत त्यांची तुलना दुर्योधनशी केली आहे. त्या हरियाणातील अबांला येथील प्रचारासभेत आयोजन बोलत होत्या.

या देशात गर्व आणि अहंकार करणाऱ्याला कधीच माफ केलं जात नाही, महाभारतात दुर्योधनालाही असाच अहंकार झाला होता, असा महाभारताचा संदर्भ देत प्रियांका गांधींनी नरेंद्र मोदीवर खरपूस टीका केली आहे.

नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन, अशी टीका केली होती.

दरम्यान, राजीव गांधींवर केलेल्या टीकेमुळे मोदींवर काँग्रेस नेते सातत्याने टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-माझा जावई माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचही ऐकत नाही- रावसाहेब दानवे

-‘जय श्रीराम’च्या घोषणा भारतात नाहीतर पाकिस्तानात द्यायच्या का?; अमित शहांचा ममतादीदींना सवाल

-काँग्रेसने साधू संतांना त्रास देणं बंद करा; साध्वी प्रज्ञा

-बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

-मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला मतदारांनी पंतप्रधान पदावर बसवू नये- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या