बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यातच आता कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं केंद्रीय वैद्यकीय सल्लागारांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे तरूणांना कोरोनाने ग्रासलं आहे, त्याप्रमाणे आता तिसऱ्या लाटेत कोरोनाचा लहान मुलांना सर्वात मोठा धोका असणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिकेने तयारी चालू केली आहे.

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणारा प्रादुर्भाव पाहता पुणे महापालिका अलर्ट मोडवर आहे. त्यासाठी आता पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोविड केअर सेंटर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात हे चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारलं जाईल. या ठिकाणी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे.

राजीव गांधी रुग्णालयात चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारण्यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च येणार असून येत्या दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे. पुण्याबरोबर आता औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. तर नागपूर आणि ठाण्यात देखील 100-100 बेडचं रूग्णालय उभारण्यात येणार आहे.

दरम्यान,  तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

पुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

आम्ही आमच्याकडून भारताला शक्य तेवढी मदत करू- कमला हॅरिस

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More